Home » पोलिसानेच घातल्या ओडिशाच्या आरोग्यमंत्र्याला गोळ्या

पोलिसानेच घातल्या ओडिशाच्या आरोग्यमंत्र्याला गोळ्या

by नवस्वराज
0 comment

भुवनेश्वर : ओडिशाचे आरोग्य मंत्री नब दास यांना एका सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकानेच छातीत पाच ते सहा गोळ्या घातल्या. याप्रकरणतील एएसआय गोपालदास याला  अटक करण्यात आली आहे. एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते ब्रजराजनगरला गेले होते. कारमधुन दास उतरताच काही कळण्यापूर्वीच त्यांच्यावर हल्ला झाला.

गुन्हे अन्वेषण विभागाला  या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी तत्काळ स्पष्ट केले. ते म्हणाले की, मंत्री नब दास कारमधुन उतरताच त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. नब किशोर दास २०१५ मध्ये सभागृहातच अश्लिल व्हिडिओ पाहताना दिसून आले होते. त्यानंतर तत्कालीन विधानसभा अध्यक्ष निरंजन पुजारी यांनी त्यांना आठवडाभरासाठी निलंबित केले होते. या प्रकरणी नब दास म्हणाले होते की, मी माझ्या आयुष्यात एकदाही अश्लिल व्हिडिओ पाहिला नाही. इंटरनेट वापरत असताना चुकून हा प्रकार घडला. पण चूक लक्षात येताच मी ती दुरुस्त केली. नब किशोर ओडिशा सरकारच्या सर्वात श्रीमंत मंत्र्यांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे १५ कोटींहून अधिकच्या किंमतीची जवळपास ७० वाहने आहेत. त्यात एका मर्सिडीज बेंझचाही समावेश आहे. या कारची किंमत जवळपास १.१४ कोटी रुपये आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!