ब्रेकिंग
  • Madhya Pradesh : पिकअप व्हॅन उलटून झालेल्या अपघातात 14 प्रवाशांची मृत्यू. | National Highway : एक मार्चपासून बंद होणार केवायसी नसलेले फास्टटॅग.

न्यूज इनशॉर्ट

Supreme Court : दोनपेक्षा जास्त अपत्य असल्यास सरकारी नोकरी नाही

New Delhi : राजस्थानमध्ये दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या लोकांना सरकारी नोकरी करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान सरकारच्या 1989 मधील निर्णयाला आता मंजुरी प्रदान केली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात माजी सैनिक रामजी लाल जाट यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आता अपत्यांचे बंधन सरकारी नोकरीसाठी पाळावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे.
Read More

Nagpur : रामझुल्यावर भीषण अपघात

Ram Zula : रामझुला मेयो उतारावरील कर्व्ह मेट्रो खांबाजवळ झालेल्या अपघातात एक ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली. महम्मद हुसैन गुलाम मुस्तफा (वय 34) हा त्याचा मित्र महम्मद आतीफ महम्मद जिया (वय 32) याच्यासोबत दुचाकीवर सदरकडून मेयो हॉस्पीटलकडे येत असताना मागून येणाऱ्या कारने त्यांच्या वाहनाला धडक दिली. कारमध्ये माधुरी शिशीर सारडा (वय 37), रितीका उर्फ रितु दिनेश मालु (वय 39) या महिला होत्या.
Read More

Akola Corporation : कविता द्विवेदी यांची पुण्यात बदली

IAS Transfer : राज्यातील 12 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश सरकारने काढले आहेत. अकोला मपनाच्या आयुक्त कविता द्विवेदी यांनी पुण्याला बदली करण्यात आली आहे. द्विवेदी यांच्यासोबतच डॉ. हेमंत वसेकर, कौस्तुभ दिवेगावकर, कार्तिकी एन. एस. (सीईओ स्मार्ट पुणे), मिलिंद शंभरकर (मुंबई), एम. जे. प्रदीप, कावली मेघना, विजय सिंगल, संजय सेठी, पराग जैन, ओ. पी. गुप्ता, राजेश कुमार यांचा यात समावेश आहे.
Read More

Pakistan : शाहबाज शरीफ नवे पंतप्रधान

निवडणुकीनंतर पाकिस्तान मुस्लीम लिग-नवाझ (PML-N) आणि पाकिस्तान पिपल्स पार्टी (PPP) यांच्यात युती होणार आहे. शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होतील. पीपीपीचे सह-अध्यक्ष असिफ अली झरदारी यांची पाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणून निवड केली जाईल.शाहबाज यांच्या मंत्रिमंडळात कोणाला कोणते मंत्रिपदं दिली जातील, याचा तपशील नंतर जाहीर केला जाणार आहे. पाकिस्तानात 8 फेब्रुवारीला निवडणूक झाली होती.
Read More

Maratha Reservation : आधीचा मुद्दा जसाच्या तसा घेतला

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दोनदा प्रयत्न झाला. ते आरक्षण न्यायालयाने रद्द केले. आता पुन्हा विधेयक सादर झाले. सरकारने जुनाच मसुदा जसाच्या तसा घेतला आहे. हा प्रस्ताव विधानसभेने मान्य केला. आरक्षणाचे सर्वोच्च न्यायलयात काय होईल यावर सगळे भविष्य अवलंबून आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
Read More

Pradip Mishra : शिवकथाकारास जीवे मारण्याची धमकी

सिहोर येथील कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यासंदर्भात अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून मिश्रा यांच्या सुरक्षेची मागणी केली. डिसेंबर 2023 मध्ये मिश्रा अमरावती येथे कथेसाठी गेले होते. येथे त्यांना धमकीचे पत्र मिळाले होते. याबाबत त्यांनी राणांना कळविले होते.
Read More

Lok Sabha Election 20224 : यूपीत इंडिया आघाडीचे घोडे अडले

यूपीमधील इंडिया आघाडी तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. काँग्रेस आणि सपामध्ये जागावाटपावर एकमत झालेले नाही. सपाने काँग्रेसला लोकसभेच्या 17 जागा ऑफर केल्या होत्या. त्याचबरोबर काँग्रेसला यूपीमध्ये 20 जागांवर लोकसभेचे उमेदवार उभे करायचे आहेत.त्यावरून त्यांच्यात मतभेद आहेत. यावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद सुरूच आहेत. त्यामुळे युती तुटण्याची चिन्हे आहे.युती तुटल्यास भाजपला फायदा होईल.
Read More

Britan : सुनकविरोधात 100 खासदार राजीनामा देण्याची शक्यता

भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षात 100 पेक्षा जास्त खासदारांनी निवडणुकीआधी पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक खासदारांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यांनी खासगी क्षेत्रात नोकरी शोधण्यास सुरुवात केली आहे. हुजूर पक्ष पोटनिवडणुकांत सतत पराभूत होत आहे. त्यामुळे सुनक यांचे खासदार धास्तावले आहेत.
Read More

Asaduddin Owesi : हिंमत असेल तर बाबरी…

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक तुमच्याकडे येतील तेव्हा त्यांना विचारा तुमच्यात बाबरीचं नाव घेण्याची हिंमत आहे का, असे विधान असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे. आम्ही अमित शाह यांच्यासमोर बाबरी जिंदाबादचे नारे दिले आहेत. आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादीने काहीही शिकवू नये. बाबरी मशीद जिवंत होती आणि राहिल, असे ओवैसी यांनी नमूद केले.
Read More

Dhangar Reservation : धनगर समाजाला मोठा धक्का

मुंबई उच्च न्यायालयाने धनगर समाजाची अनुसूचित जमातीमधून (एसटी) आरक्षण देण्याची याचिका फेटाळली. काही संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. एनटीमधून एसटी प्रवर्गात समावेशासाठी पूर्तता आणि पडताळणी झालेली नाही, असे न्या. गौतम पटेल, कमल काथा म्हणाले. धनगरांना एनटी प्रवर्गाचे साडेतीन टक्के आरक्षण आहे. धनगर समाजाची सुधारित आरक्षणाची मागणी रास्त नाही. ती मान्य करता येणार नाही, असे खंडपीठाने सांगितले.
Read More
Top Selling Multipurpose WP Theme

नवस्वराज - व्हिडिओ

Top Selling Multipurpose WP Theme
banner
banner
banner

आम्हाला बातम्या पाठविण्यासाठी येथे क्लिक करा

error: Content is protected !!