Home » रामराज्य प्रतिष्ठानतर्फे अकोल्यात रक्तदान शिबिर

रामराज्य प्रतिष्ठानतर्फे अकोल्यात रक्तदान शिबिर

by Navswaraj
0 comment

अकोला : रामराज्य प्रतिष्ठानतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त अकोल्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी प्रतिष्ठानतर्फे हे रक्तदान शिबिर घेण्यात येते. याशिवाय प्रतिष्ठानतर्फे विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात येतात. त्यानुसार प्रजासत्ताक दिनानिमित्त सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिर घेण्यात आले. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी शिबिराचा शुभारंभ केला.

रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी धीरज देशमुख, ऋषी गावंडे, हर्ष चौधरी, रजत हनपुढे, सुरज देशमुख, संतोष रंगवहाळ, कपिल देशमुख, पीयूष पागधूने, आनंद लकडे, राम गावंडे, अभी धनोकार, प्रतीक काळे, सिद्धार्थ अहिर यांच्यासह रामराज्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!