अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) आता ८०० खाटांचे होणार आहे. त्याकारिता आमदार सुलभा खोडके यांच्यासह आरोग्य यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पाहणी करून नवीन प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
धारणी, मेळघाट तसेच मध्यप्रदेशाच्या सीमाभागातून रुग्ण उपचारासाठी ईर्विनमध्ये दाखल होतात. सद्या रुग्णालयात ३९० बेड्स उपलब्ध असल्याने एका बेडवर दोन पेशंट अशी स्थिती आहे. त्यामुळे इर्विनमध्ये वाढीव ४०० खाटांची संख्या म्हणजेच एकूण ८०० खाटांचे नवीन हॉस्पिटल साकारण्याचा संकल्प आहे. डफरीन परिसरात इर्विनसाठी ४०० खाटांचे रुग्णालय थाटण्यात येणार आहे. आमदार सुलभा खोडके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधिमंडळ समन्वयक संजय खोडके, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण साळुंके, सुपरचे कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश मेंढे, जिल्हा स्त्री रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार, अधीक्षक वैद्यकीय अधिकारी -तलत खान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता रूपा राऊळ-गिरासे, उपविभाग क्रमांक-१ चे उपविभागीय अभियंता तुषार काळे, उप-विभागीय अभियंता श्रीकृष्ण गोमकाळे, शाखा अभियंता एन. प्रकाश रेड्डी, कनिष्ठ अभियंता पी. आर. गोधे, ईर्विनचे कनिष्ठ लिपिक राजू सानप, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील कार्यालयीन अधीक्षक स्मिता नंदागवळी, सहाय्यक अधिक्षक रवींद्र तुरे,कनिष्ठ लिपिक तुळजागीर गिरी, रवींद्र मेटकर, नितीन बोरकर, स्वाती चांदोरे, वंदना चव्हाण, पल्लवी बोबडे, अधिसेविका-जया सौदागरे,कल्पना टवलारे, पदमा खंडाते यांनी यासाठी पाहणी केली.