Home » Akola News : डॉ. हेडगेवार रुग्णालय आणि अनुसंधान केंद्रातील किडनी प्रत्यारोपण कार्यशाळा 

Akola News : डॉ. हेडगेवार रुग्णालय आणि अनुसंधान केंद्रातील किडनी प्रत्यारोपण कार्यशाळा 

by नवस्वराज
0 comment

Akola | अकोला : डॉ. हेडगेवार रुग्णालय व अनुसंधान केंद्र अकोला धर्मदाय रुग्णालयात अल्पदरात डायलिसिस, पॅथोलॉजी, मायक्रोबॉयलॉजी, सोनोग्राफी, एक्स- रे तपासणी सोबत विविध रोगांचे तज्ञ डॉक्टर नियमित रुग्ण तपासणी करतात. अकोला जिल्ह्यातील अनेक गरजू रुग्ण या सेवांचा लाभ घेतात.

अकोला जिल्हा आणि जवळपासच्या किडणीच्या रुग्णांकरिता किडणी प्रत्यारोपण सुविधा सुरू करण्याच्या उद्देशाने समुपदेशन केंद्राची सुरुवात करण्यात आली. अकोल्यातील प्रसिद्ध किडणी रोग तज्ञ डाॅ. प्रशांत मालविय यांच्या पुढाकाराने डॉ. हेडगेवार रूग्णालय व अनुसंधान केंद्रात रविवार दि. 03 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत किडनी प्रत्यारोपण संदर्भात रुग्ण त्यांचे नातेवाईक तसेच डॉक्टर यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे किडणी प्रत्यारोपण तज्ञ डॉ. नीरज इनामदार यांच्यासह अकोल्यातील डॉ. वैशाली डोसे, डॉ. प्रशांत मालविय यांनी किडणी प्रत्यारोपणा संदर्भात रुग्ण त्यांचे नातेवाईक, डायलिसिस तंत्रज्ञ यांना सविस्तर माहिती दिली, किडणी प्रत्यारोपण संदर्भात प्रचलित समज व गैरसमज या बाबत मार्गदर्शन करून शंका निरसन केले. कार्यशाळेला अकोल्यातील नामांकित डॉक्टर, समुपदेशक, अधिवक्ता, रुग्णालयाचे विश्वस्त तसेच रूग्ण आदी उपस्थित होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!