Home » शिवसेनेच्या बंडखोर गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव

शिवसेनेच्या बंडखोर गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव

by Navswaraj
0 comment

नवी दिल्ली : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या गटाने सर्वोच्च न्यायलायात धाव घेतली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी 16 आमदारांना अपात्र आणि गटनेता कारवाईसाठी पाठवलेल्या नोटीसीविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

शिवसेनेने विधिमंडळाच्या गटनेतेपदी अजय चौधरी यांची नियुक्ती केली आहे. विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी बंडखोर 16 आमदारांना नोटीस बजावली आहे. त्यांना 48 तासांच उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याची मुदत सोमवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत असेल. या दोन मुद्यांविरोधात शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत शिंदे गटाकडून तीन मुद्दे दाखल करण्यात आले आहेत. यात बंडखोर आमदार व त्यांच्या परिवाराला संरक्षण पुरविण्याचाही मुद्दा आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!