Home » अकोल्यात पाच जणांवर काळाचा घाला; दोन घटनांत मृत्यू

अकोल्यात पाच जणांवर काळाचा घाला; दोन घटनांत मृत्यू

by Navswaraj
0 comment

अकोला : अकोल्यात पाच जणांवर काळाने घाला घातला आहे. दोन घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यात विजेचा शॉक लागल्याने तीन जणांचा मृत्यू झाला तर दोन भीषण अपघातांत दोघांचा बळी गेला.

वणी रंभापूर येथील एका कंपनीत काम करताना श्रीकृष्ण वावगे (वय ३५, राहणार बोरगाव मंजू), चंद्रशेखर अप्तूरकर (वय ३०, राहणार काटेपूर्णा), विनोद वाघमारे (वय ३५, राहणार अन्वी, मिर्झापूर) यांना विजेच्या पोलवर लाईट लावण्याचे काम करीत असताना शॉक लागला. उपचारादरम्यान यातील दोघांचा मृत्यू झाला. घटनेनंतर बोरगाव मंजू येथील गावकऱ्यांनी तरुणाचा मृतदेह कंपनीसमोर आणून रोष व्यक्त केला व कारवाईची मागणी केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत आंदोलनकर्त्यांची समजून काढली. कंपनीने नुकसान भरपाई देण्याची हमी दिल्याने अनर्थ टळला.

दुसऱ्या घटनेत राष्ट्रीय महामार्गावरील बस व दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरस्वार असलेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील शळद फाट्याजवळ घडली. महान पिंजर रस्त्यावर दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने एकाचा मृत्यू, तर दोघे जखमी झाले. दुचाकीस्वार प्रमोद नारायण कदम यांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. यात गोपाल रामचंद हातोलकर, मंगेश भोसले हे जखमी झाले. प्रमोद कदम यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!