Home » भारतात मार्च २०२३ पर्यंत फाईव्ह-जी सेवा

भारतात मार्च २०२३ पर्यंत फाईव्ह-जी सेवा

by Navswaraj
0 comment

नवी दिल्ली : भारताला मार्च २०२३ पर्यंत संपूर्ण 5G सेवा मिळेल, असे केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले. पॅरिस येथील व्हिवा टेक्नॉलॉजी २०२२ कार्यक्रमादरम्यान त्यांनी ही माहिती दिली.

स्पेक्ट्रमचा लिलाव जुलैअखेर पूर्ण होईल. भारताकडे स्वतःचे स्टॅक आहे. देशात 5G प्रयोगशाळेत तयार आहे. नव्या तंत्रज्ञानात कोणत्याही त्रुटी राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी स्पेक्ट्रम लिलाव आयोजित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. २०१४ मध्ये १०-कोटी ग्राहक ब्रॉडबँड वापरत होते. आता ही संख्या तुलनेत ८० कोटी झाली आहे. 5G तंत्रज्ञान आणि आगामी 6G तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत एक अग्रगण्य देश म्हणून उदयास येणार आहे, तो काळ फार दूर नाही, असे केंद्राने म्हटले आहे.

error: Content is protected !!