Home » पोलिस वेशात रविकांत तुपकरांचा पत्नी, आईसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न

पोलिस वेशात रविकांत तुपकरांचा पत्नी, आईसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न

by नवस्वराज
0 comment

बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेले आंदोलन आता चांगलेच तापले आहे. कापूस आणि सोयाबीनला चांगला भाव मिळावा म्हणून स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. यासंदर्भात त्यांनी ईशारा दिला होता. त्यानंतर तुपकर भूमिगत झाले होते. शनिवार, ११ फेब्रुवारी २०२३ रोजी आंदोलन सुरू होताच तुपकर अचानक आलेत व त्यांनी अंगावर पेट्रोल घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.

आंदोलनात सहभागी झालेल्या आई आणि पत्नीसमोरच तुपकर यांनी हे कृत्य केले. त्यामुळे बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चांगलीच खळबळ उडाली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळळा. मात्र या आंदोलनामुळे राज्य सरकारबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चीड, संताप आणि तळतळाट निर्माण झाला आहे. आंदोलनाच्या वेळी तुपकर प्रचंड संतापले होते. आम्हाला गोळ्या घाला. शेतकऱ्यांना गोळ्या घाला. आमच्या मागण्या मान्य करत नसाल तर आम्हाला मारून टाका. हे कसले सरकार आहे. या सरकारला जनतेचे काही पडलेले नाही. शेतकऱ्यांचे काहीही घेणेदेणे नाही. त्यामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जात आहे, असा आरोप तुपकर यांनी यावेळी केला.

error: Content is protected !!