Home » Akola Cotton : कापसाला प्रति क्विंटल सात हजारापेक्षा कमी भाव

Akola Cotton : कापसाला प्रति क्विंटल सात हजारापेक्षा कमी भाव

by Navswaraj
0 comment

अकोला | Akola News : अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कापसाचे पीक घेतले आहे. गेल्या वर्षी कापसाला १४ ते १६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. त्यामुळे यंदा जिल्ह्यात कापसाचा पेरा वाढला. परंतु यंदा मात्र दर कोसळल्याने कापूस उत्पादकांची निराशा झाली आहे. सध्या कापसाला प्रति क्विंटल ७ हजार रुपयांपेक्षाही कमी भाव मिळत आहे. (Akola farmer disappointed due to down fall in cotton rates)

सध्या कापसाला सात हजारांपेक्षाही कमी भाव मिळत आहे. सध्या सुरू असलेल्या हंगामातील कापूस आता शेतकऱ्यांच्या हाती येणार आहे. अशात कापसाला भावच नसल्याने शेतकरी निराश झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या घरात अद्यापही जुना कापूस पडुन आहे. त्यामुळे दोन्ही वर्षीचा कापूस कसा विकायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. विदर्भातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कापूस आणि सोयाबीनचे पीक घेतात. आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक पीक कापसाचे व्हायचे. त्यानंतर शेतकरी सोयाबीनचे पीक घ्यायला लागले. अकोल्यात सुमारे दहा वर्षांपूर्वी कापसाचे उत्पादन सर्वाधिक व्हायचे. त्यानंतर सोयाबीनचे उत्पादन व्हायला लागले. जवळपास दोन ते सव्वा लाख हेक्टरवर आता सोयाबीनची लागवड होते. तर दीड लाख हेक्टरवर कापसाची लागवड होत आहे.

कापसाच्या उत्पादनासाठी ३५ ते ४० हजार रुपये एकरी खर्च येतो. सध्या जिल्ह्यात पाच ते हजार क्विंटल कापूस एकरी होत आहे. मात्र सात हजार रूपये दर मिळत असल्याने उत्पादन खर्चापेक्षा पाच ते दहा हजार रुपये तोटा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!