Home » एकनाथ शिंदे गटातर्फे १ हजार १५० विमा पत्रकांचे वाटप

एकनाथ शिंदे गटातर्फे १ हजार १५० विमा पत्रकांचे वाटप

by Navswaraj
0 comment

अकोला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना गटातर्फे १ हजार १५० विमा पत्रकांचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधून नि: शुल्क अपघाती विमा पत्रक वाटप करण्यात आले. मराठी गीत गायनाने संगीत
रजनी कार्यक्रम तसेच केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

राज्यस्तरीय उपक्रमाचा भाग म्हणून अकोल्यातही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन संपर्कप्रमुख तथा उपनेते माजी आमदार गोपीकिशन बाजोरीया व आमदार विप्लव बाजोरीया यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. कार्यक्रमास सहसंपर्क प्रमुख संदीप पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी निवासी उपजिल्हा प्रमुख योगेश बुंदेले, सरचिटणीस राजेंद्र नेरकर, उपजिल्हा प्रमुख राजेश चव्हाण, गजानन रोकडे, शहर प्रमुख कमल खरारे, शहर प्रमुख अतुल येळणे, प्रा. निखील नाळे नवीन पाली, मयुर गुजर, वैभव राऊत यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल नागापुरे यांनी केले. संगीत रजनी कार्यक्रमाने प्रेक्षकांनी प्रथमच महानगरात मुख्यमंत्री यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा होताना अनुभवला. नागापुरे यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या राज्याच्या विकासाबद्दल माहिती दिली. यावेळी शहरप्रमुख योगेश अग्रवाल, उपजिल्हाप्रमुख शशिकांत चोपडे, युवा सेनेचे राज यादव, युवा सेना सरचिटणीस चेतन थामेद, युवा सेना शहरप्रमुख विकीसिंग बावरी, रवी देशमाने, अविनाश पुनेरे, प्रफुल्ल रोकडे, प्रतीक सापधरे, स्वराज ठाकूर, सोनू इंगळे आदी उपस्थित होते. असे जिल्हा सरचिटणीस राजू नेरकर यांनी कळवले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!