Home » विद्यापीठाची एन्व्हायरन्मेंटल स्टडिज परीक्षा पुढे ढकलली

विद्यापीठाची एन्व्हायरन्मेंटल स्टडिज परीक्षा पुढे ढकलली

by नवस्वराज
0 comment

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या एन्व्हायरन्मेंटल स्टडिज (ईव्हीएस) परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच् प्रभारी संचालक एम. डी. तोटे-पाटील यांनी ही माहिती दिली. या बदलांसंदर्भात विद्यापीठाने मंगळवार, १६ मे २०२३ रोजी विद्यापीठाशी संलग्न सर्व कॉलेजेस, शैक्षणिक विभाग, मॉडेल डिग्री कॉलेजला पत्र पाठविले आहे.

विद्यापीठातील नियमित व माजी विद्यार्थ्यांची एन्व्हायरन्मेंटल स्टडिज (ईव्हीएस) या विषयाची परीक्षा पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे ४ जून २०२३ रोजी होणार होती. आता ही परीक्षा ४ जूनला होणार नाही. लेखी परीक्षेची तारीख आता विद्यापीठाने पुढे ढकलली आहे. आता एन्व्हायरन्मेंटल स्टडिज (ईव्हीएस) या विषयाची लेखी परीक्षा रविवार, ११ जून २०२३ रोजी होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत ही परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती संचालक तोटे-पाटील यांनी दिली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!