Home » विधान परिषदेचे उमेदवार जाहीर; अमरावतीचे श्रीकांत भारतीय यांना संधी

विधान परिषदेचे उमेदवार जाहीर; अमरावतीचे श्रीकांत भारतीय यांना संधी

by Navswaraj
0 comment

मुंबई : राज्यात २० जूनला विधान परिषदेसाठी निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या दहा आमदारांचा कार्यकाळ संपल्यामुळे दहा जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. भाजपाने पाच उमेदवार हे जाहीर केले आहेत. यात अमरावतीचे श्रीकांत भारतीय यांना संधी देण्यात आली आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा पत्ता मात्र कापण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले मतभेद त्यांना भोवल्याची चर्चा भाजपमध्ये आहे. कॉंग्रेसने, शिवसेनेने प्रत्येकी दोन उमेदवार जाहीर केले आहेत.

भाजपने पाच नावे जाहीर केली आहेत. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे ही ती नावे आहेत. शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी ही दोनच नावे आहेत. चंद्रकांत हंडुरे आणि भाई जगताप हे काँग्रेसकडून निवडणूक लढतील.

 

error: Content is protected !!