Home » अकोला येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय

अकोला येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय

by Navswaraj
0 comment

मुंबई : अकोला येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय मंगळवार, १६ मे २०२३ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

अकोल्यातील या नवीन महाविद्यालयातील ५६ शिक्षक, ४८ शिक्षकेतर संवर्ग असे १०४ पदे तसेच बाह्य स्त्रोताद्धारे ६० पदे अशी १६४ पदे नव्याने निर्माण करण्यासही मान्यता देण्यात आली. या पदांसह इतर अनुषंगिक खरेदी आदी साठी मिळून ३१६ कोटी ६५ लाख एवढ्या खर्चास मान्यता देण्यात आली. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पीय भाषणात जळगाव आणि अकोला जिल्ह्यात दोन नवीन पशूवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषण केली होती. त्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

अकोल्यात नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी प्रयत्न केले होते. यासंदर्भातील मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पशू संवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष लक्ष घालत अर्थसंकल्पात महाविद्यालयाची घोषणा केली. त्यानंतर मंगळवारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजूर करून घेतले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!