Home » अकोल्यात ठाकरे गटाच्या राजेश मिश्रांवर प्राणघातक हल्ला

अकोल्यात ठाकरे गटाच्या राजेश मिश्रांवर प्राणघातक हल्ला

by Navswaraj
0 comment

अकोला : शिवसेना ठाकरे गटाचे अकोला महानगराध्यक्ष राजेश मिश्रा यांच्यावर प्राणघातक हल्ला कारण्यात आला. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मिश्रा आणि अहीर गटात किरकोळ कारणांवरून वाद होऊन हाणामारी झाली. यावेळी अनेकांच्या हातात लोखंडी पाईप आणि तलवार देखील होती. या हाणामारीत मिश्रा गटातील राजेश मिश्रा यांच्या हाताला आणि नाकाला गंभीर दुखापत झाली आहे. अहीर गटातही काही लोकांना दुखापत झाली. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही हल्ला करण्यात आला.

अकोला शहरातील हरिहर पेठ भागात आज रविवारी सकाळी ११ वाजता दोन गटात हाणामारी सुरू झाली. शिवसेना ठाकरे गटाचे अकोला महानगराध्यक्ष राजेश मिश्रा आणि प्रवीण अहीर गटात किरकोळ कारणावरून तुफान हाणामारी झाली. या हाणामारी दरम्यान अनेकांच्या हातात लाठ्या काठ्या, लोखंडी पाईप, तलवार देखील होती. पोलीस कॉन्स्टेबल शेख रशीद यांच्या डोक्यावर लाठी बसली. पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांचा चष्माही या घटनेत तुटला. याप्रकरणी पोलिसांनी पाच ते सहा जणांना ताब्यात घेतले आहे. हाणामारी प्रकरणी दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार नितीन देशमुख यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!