Home » Bar Council Election : मोहता, बेलसरे, राऊत, धोत्रे विजयी

Bar Council Election : मोहता, बेलसरे, राऊत, धोत्रे विजयी

District Court : अकोला बार असोसिएशनचा निवडणूक निकाल जाहीर

by नवस्वराज
0 comment

अश्विन पाठक | Ashvin Pathak

Akola : जिल्हा वकील संघाच्या शुक्रवारी (ता. 9) झालेल्या निवडणुकीत अकोल्यात  हेमसिंह मोहता, अॅड. नरेंद बेलसरे, शीतल राऊत, दुष्यंत धोत्रे यांनी विजय मिळविला. रेल्वे स्थानक मार्गावर असलेल्या जिल्हा न्यायालयाच्या परिसरात शुक्रवारी निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले.

जिल्ह्यातील 881 वकिलांनी निवडणुकीत मतदान केले. अध्यक्ष पदासाठी संतोष गोळे यांना 311 मते मिळाली.  मोतीसिंह मोहता यांचे चिरंजीव हेमसिंह मोहता यांना 561 मते मिळाली. उपाध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत नरेंद्र बेलसरे यांना 336 मते मिळाली. अन्वर पठाण यांना 61,  संतोष वाघमारे यांना 236 आणि राहुल वानखडे यांना 238 वकिलांनी मतदान केले.

महिला उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत सुनिता कपिले यांना 414 मते मिळाली. शीतल राऊत यांनी 456 मतदान मिळवित विजय प्राप्त केला. सहसचिव पदासाठीच्या निवडणुकीत चार उमेदवार रिंगणात होते. त्यातील कैलास अनमाने यांना 36,  दुष्यंत धोत्रे यांना 523, सुमेध डोंगरदिवे यांना 279 आणि सौरभ तेलगोटे यांना 26 मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ सत्यनारायण जोशी यांनी काम पाहिले. ए. जे. ठाकूर, परवेझ दोकडिया, रविकांत ठाकरे यांनी जोशी यांना निवडणूक कामी सहाय्य केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!