Home » कामगार सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालाेकार यांचा भाजपमध्ये प्रवेश

कामगार सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालाेकार यांचा भाजपमध्ये प्रवेश

by Navswaraj
0 comment

अकोला : शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख तथा महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालाेकार यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. काही दिवसांपूर्वीच मालाेकार यांनी पक्षाकडे राजीनामा पाठवला हाेता.

प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, माजी महापाैर अर्चना मसने, जयंत मसने, तेजराव थाेरात, श्रावण इंगळे, चंद्रशेखर पांडे गुरुजी आदी हाेते. गत रविवारी मालाेकार यांनी कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांच्याकडे राजीनामा पाठवला होता.

error: Content is protected !!