Home » कांदा उत्पादकांसाठी अकोल्यात वंचितचे आंदोलन

कांदा उत्पादकांसाठी अकोल्यात वंचितचे आंदोलन

by Navswaraj
0 comment

अकोला : अवकाळी पाऊस आाणि गारपिटीमुळे अकोला जिल्ह्यातील शेतकरी व कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने अकोल्यात धरणे आंदोलन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर धरणे दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवदेन पाठविले. त्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाकडे तत्काळ लक्ष देणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीची फटका शेतकरी, शेतमजूर, फळबागायतदार, कांदा उत्पादकांना बसला आहे. मात्र अद्यापही अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचनामे करून नुकसान भरपाई मिळालेली नाही, याकडे वंचितने शासनाचे लक्ष वेधले.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या नेतृत्वात महासचिव मिलिंद इंगळे, सुनिल फाटकर, संगिता अढाऊ, प्रभा शिरसाट, गजानन गवई, आशिष मांगुलकर, प्रतिभा अवचार, योगिता शेळके, युवका जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, आनंद खंडारे, नितीन सपकाळ, आनंद डोंगरे, विकास सदांशिव, कविता राठोड, मंगला शिरसाट, किशोर जामनिक, राजकुमार दामोदर, समीर पठाण, अजय शेगावकर, शरद इंगळे, मोहन तायडे, वंचित कामगार आघाडीचे मधुकर गोपनारायण, अमोल जामनिक आदी सहभागी झाले होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!