Home » सुनिल कडासने बुलडाण्याचे नवे एसपी

सुनिल कडासने बुलडाण्याचे नवे एसपी

by नवस्वराज
0 comment

बुलडाणा : बुलडाण्याचे नवीन पोलिस अधीक्षक म्हणून सुनिल कडासने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गृह विभागाने यासंदर्भातील अधिकृत आदेश सोमवार, ८ मे २०२३ रोजी निर्गमित केले आहेत. कडासने सध्या नागपूर लोहमार्ग येथे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

राज्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृह विभागाने सोमवारी निर्गमित केले. त्यात सुनिल कडासने व महेश पाटील या दोघांचा समावेश आहे. गृह विभागाच्या सहसचिवांनी यासंदर्भातील आदेश काढले. सुनिल कडासने यांनी यापूर्वीही विदर्भात काम केले आहे. पोलिस उपअधीक्षक म्हणून त्यांना बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे.

महाराष्ट्र पोलिस सेवेअंतर्गत उपअधीक्षक म्हणून पोलिस दलात कार्यरत झालेल्या सुनिल कडासने यांनी मलकापूर येथे असताना आव्हानात्मक परिस्थिती हाताळली. अनेक संवेदनशील प्रकरणे व परिस्थितीला ते खंबीरपणे सामोरे गेले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणूनही त्यांनी कामाचा प्रदीर्घ अनुभव मिळविला. नाशिक अॅन्टी करप्शन ब्युरोचे अधीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांना आयपीएस अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली. अलीकडेच ते नागपूर लोहमार्ग (जीआरपी) दलाचे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. आता ते विदर्भातील बुलडाणा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!