Home » अंनिसचे श्याम मानव यांच्या नागपुरातील कार्यक्रमात गोंधळ

अंनिसचे श्याम मानव यांच्या नागपुरातील कार्यक्रमात गोंधळ

by Navswaraj
0 comment

नागपूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्राध्यापक श्याम मानव यांच्या नागपुरातील कार्यक्रमात गोंधळ घालण्यात आला आहे. श्याम मानव फक्त हिंदू धर्माच्या विरोधात बोलून हिंदू धर्माला बदनाम करत आहेत.

सभेच्या माध्यमातून त्यांनी कुठेही धीरेंद्र कृष्ण महाराज यांची पोलखोल केली नाही. फक्त हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी सभेचा वापर केला असा आरोप करत काही तरुणांनी घोषणाबाजी केली. बागेश्वर धाम सरकारचे धीरेंद्र कृष्ण महाराज यांची पोलखोल करण्यासाठी नागपुरात अंनिसतर्फे सभेचे आयोजन करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी नागपुरात धीरेंद्र कृष्ण महाराज यांची राम कथा आणि दिव्य दरबार झाले होते. या दिव्य दरबारच्या माध्यमातून धीरेंद्र कृष्ण महाराज अंधश्रद्धा पसरवतात असा अंनिसने आरोप केला होता.

धीरेंद्र कृष्ण महाराज नागपुरात असतानाच अंनिसने त्यांना दिव्य शक्ती सिद्ध करा आणि तीस लाख रुपये मिळवा असे आव्हान दिले होते. मात्र धीरेंद्र कृष्ण महाराज अंनिसचे आव्हान न स्वीकारताच आपली राम कथा संपवून नागपुरातून परत गेल्याची टीका अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली होती.

error: Content is protected !!