Home » अमरावती विद्यापीठातील भरतीची जाहिरात बनावट

अमरावती विद्यापीठातील भरतीची जाहिरात बनावट

by Navswaraj
0 comment

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात विविध पदांच्या भरतीची दिशाभूल करणारी जाहिरात सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा प्रकारे विद्यापीठाकडून कोणत्याही पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द केलेली नाही. युवकांनी अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीला बळी पडू नये, असे आवाहन कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी केले आहे.

शनिवार दिनांक ६ मे २०२३ पासून सोशल मीडियावर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात अधीक्षक, मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, लेखापाल, सहाय्यक ग्रंथपाल, ग्रंथपाल परिचर, शिपाई, चौकीदार अशा विविध पदांच्या भरतीची जाहिरात सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक या जाहिरातीला बळी पडून त्याबाबतची विचारणा करीत आहेत. प्रत्यक्षात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाकडून अशा प्रकारच्या कोणत्याही पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. जाहिरात प्रसिद्ध करुन कोणीतरी खोडसाळपणा व संभ्रम निर्माण केला आहे. सुशिक्षित बेरोजगार युवकांनी अशा प्रकारच्या जाहिरातीला बळी पडू नये, असे विद्यापीठाच्यावतीने रितसर कळविण्यात आले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!