Home » युवा वाॅरिअर्स शाखेचे अकोल्यात लोकार्पण

युवा वाॅरिअर्स शाखेचे अकोल्यात लोकार्पण

by Navswaraj
0 comment

अकोला : माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार संजय धोत्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा, अकोला महानगरच्या ‘युवा वाॅरिअर्स ‘ शाखेचे लोकार्पण प्रभाग क्रमांक १२ मधे करण्यात आले.

भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार वसंत खंडेलवाल, माजी महापौर अर्चना मसने, भाजपा अकोला महानगर अध्यक्ष तथा माझी महापौर विजय अग्रवाल, युवा मोर्चा अध्यक्ष उमेश गुजर यांच्या नेतृत्वात व युवा मोर्चा मध्य मंडळ अध्यक्ष भूषण इंदौरिया यांच्या प्रमुख उपस्थितित हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी महानगरातील सर्व भाजपा पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!