Home » अकोल्याचा‎ उमेश भाकरे ठरला ‘विदर्भ श्री’ चा मानकरी

अकोल्याचा‎ उमेश भाकरे ठरला ‘विदर्भ श्री’ चा मानकरी

by नवस्वराज
0 comment

अकोला : अकोल्याचा उमेश‎ भाकरे विदर्भश्री शरीर सौष्ठव स्पर्धेत विदर्भ श्री चा मानकरी ठरला. विदर्भ श्री शरीरसौष्टव स्पर्धा‎ कौलखेड येथील प्रांगणात झाली. विदर्भातील बॉडी बिल्डिंग‎ क्षेत्रातील युवकांना संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा‎ आयाेजित करण्यात आली.‎ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी‎ आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये विदर्भातून शंभर पेक्षा जास्त‎ स्पर्धकांनी भाग घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी क्रीडा‎ राज्य मंत्री गुलाबराव गावंडे हाेते. उदघाटन शिवसेनेचे आमदार‎ नितीन देशमुख यांनी केले. प्रमुख पाहूणे म्हणून राकाँचे प्रदेश‎ उपाध्यक्ष डाॅ. संतोष कोरपे , माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर, प्रा.‎ विश्वनाथ कांबळे व परिसरातील ज्येष्ठ नागरिक तथा शरीर सौष्ठव‎ स्पर्धेचे परीक्षक उपस्थित होते. विजेत्यांचे बक्षीस वितरण डॉ. संजय‎ मोरे, डॉ.अमोल रावणकर, माजी नगरसेवक पंकज गावंडे, जिल्हा‎ महासचिव आनंद वानखडे, शिवसेनेचे अकाेला पूर्वचे प्रमुख राहुल‎ काराळे, करण दौड, अरुण कडू यांच्या हस्ते करण्यात आले.

error: Content is protected !!