Home » ‘पेटीएम’ने भीक्षा मागणारा बाबा झाला लखपती; घेणार हेलिकॉप्टर

‘पेटीएम’ने भीक्षा मागणारा बाबा झाला लखपती; घेणार हेलिकॉप्टर

by नवस्वराज
0 comment

सागर (मध्य प्रदेश) : भीक्षा मागुन माणूस काय करू शकतो, असा विचार आपण नेहमी करतो. परंतु मध्य प्रदेशातील एक भीक्षेकरी असाही आहे ज्याने ‘पेटीएम’ या ऑनलाईन पेमेंट अॅपच्या माध्यमातून एवढी भीक्षा मिळवली आहे की तो लखपती झाला आहे. या पैशातून त्याने इंदूर आणि सागरमध्ये मालमत्ताही खरेदी केली आहे. लवकरच हेलिकॉप्टर घेण्याचे आपले स्वप्नही पूर्ण होईल, असे हे व्यक्तीचे म्हणणे आहे. वाचून धक्का बसला असेल तरी हे सत्य आहे.

मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात असलेल्या सुरखी येथील या व्यक्तीचे नाव आहे झुनझुन बाबा. सध्या या बाबाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. बाबाचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. झुनझुन बाबा फक्त ‘पेटीएम’ने भीक्षा स्वीकारतो. ‘पेटीएम’चे हे खाते त्याच्या मुलाच्या नावाने आहे. झुनझुन बाबा जेव्हा गरज असेल तेव्हा मुलाकडून पैसे घेतात. ‘पेटीएम’च्या माध्यमातून भीक्षा घेत झुनझुन बाबाने ५० लाख रुपये जमविले आहेत. त्यापैकी काही पैशातून त्याने इंदूर आणि सागरमध्ये मालमत्ता विकत घेतली आहे. भीक्षा मागितल्यावर कुणी चिल्लर नाही असे जर झुनझुन बाबाला  सांगितले तर तो लगेच ‘पेटीएम’चा ‘क्यूआर कोड’ पुढे करतो. काळानुरूप आता भीक्षा मागणारेही ‘टेक्नोसॅव्ही’ झाले आहेत, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!