नागपूर : शहरातील प्रमुख इमारती, कार्यालयांची ओळख आता परिसरातील रस्तेच दर्शवू लागले आहेत. झिरो मॉईल, संविधान चौक अर्थात रिझर्व्ह बॅंक चौक, विधानभवन चौक, आकाशवाणी चौक, जीपीओ चौक लेडीज क्लब चौक, दीक्षाभूमी चौक या चौकांमध्ये येताच येथील सिग्लनवरील झेब्रा क्रॉसिंग स्वत:ची विशेषत: दर्शवितात. महापालिका आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्ण बी. यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात ‘थीम बेस झेब्रा क्रॉसिंग’ साकारण्यात आले आहेत.