Home » राष्ट्रीय सेवा योजना हे उद्योजक घडविण्याचे व्यासपीठ : बुंदेले

राष्ट्रीय सेवा योजना हे उद्योजक घडविण्याचे व्यासपीठ : बुंदेले

by Navswaraj
0 comment

अकोला : युथ हेड फाउंडेशन पुणेतर्फे अकोलाअंतर्गत श्रीमती राधादेवी गोयनका महाविद्यालय अकोला येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिरात उद्योजकता विकास मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली.

युथ हेड फाउंडेशन पुणे ही संस्था महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उद्योजकता विकास मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करते व नवीन उद्योजकांना मार्गदर्शन करत असते यामध्ये आपल्या वस्तूची जाहिरात कशी करावी, व्यवसाय कसा स्थापन करावे, उद्योगांमध्ये येणाऱ्या अडचणी त्याच्यावर कशी मात करावी, शासनाच्या नवीन योजना जे उद्योजकाबद्दल चालतात अशा विषयावर मार्गदर्शन  करत असते.

या अंतर्गत युथ हेड फाउंडेशनचे अकोला जिल्हा समन्वयक रोहन बुंदेले यांनी श्रीमती राधादेवी गोयनका महाविद्यालय अकोला येथील आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिरात उद्योजकता विकास मार्गदर्शन कार्यशाळा दरम्यान मार्गदर्शन केले. यात रोहन बुंदेले यांनी उपस्थित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिरातील मुलींना व्यवसाय कसा स्थापन करावा, शासनाच्या योजना व उद्योग स्थापन करण्यात लागणारी सर्व आवश्य माहिती पावर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे  दिली. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.आशिष मुट्ठे, प्रा.स्मिता देवर, प्रा. महाजन, सतीश अस्वार उपस्थित होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!