Home » ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात नागपुरात रेल रोको

‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात नागपुरात रेल रोको

by Navswaraj
0 comment

नागपूर : केंद्र सरकारने संरक्षण दलात कार्यान्वित केलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात युवक काँग्रेसने नागपुरात रेल रोको आंदोलन केले. नागपूरजवळ असलेल्या अजनी रेल्वे स्थानकाच्या परिसरात हे आंदोलन करण्यात आले.

युवक काँग्रेसचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अग्निपथ योजनेच्या विरोधात नारेबाजी करीत अजनी स्थानकात शिरले. या स्थानकावरील कर्मचाऱ्यांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक आहे. नागपूर स्थानकाच्या तुलनेत येथे रेल्वे सुरक्षा बलाची (आरपीएफ) आणि रेल्वे पोलीसांची (जीआरपी) संख्या फारच कमी असते. त्यामुळे आंदोलकांचे फावले. त्यांनी प्रवासी रेल्वे गाडी रोखली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अजनी स्थानक गाठले आणि आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल केला.

अजनी सोबतच काँग्रेसच्यावतीने विधानसभा क्षेत्रनिहाय ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. अग्निपथ योजना केंद्र सरकारने रद्द करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!