Home » युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे निलंबित

युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे निलंबित

by Navswaraj
0 comment

मुंबई : युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्यावर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली आहे. त्यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघात पक्षाचा आदेश झुगारून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याबाबतची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सविस्तर माहिती दिली. “तांबे परिवाराचे काय झाले? याबाबतचे प्रश्न आम्हाला विचारू नये. कारण आम्ही त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. राहिला प्रश्न बाळासाहेब थोरात यांचा तर ते आमचे नेते आहेत. सध्या ते रुग्णालयात आहेत. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. सत्यजित तांबे यांना निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई आजच करण्यात आली आहे,” असे नाना पटोले यांनी सांगितले.

नाशिक पदवीधर मतदार संघासाठी विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यासाठी त्यांना पक्षाने एबी फॉर्मही दिला होता. मात्र अर्ज करण्याची मुदत संपेपर्यंत सुधीर तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाच नाही. त्याऐवजी सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!