Home » कर्ता हनुमान मंडळाच्यावतीने योग दिन

कर्ता हनुमान मंडळाच्यावतीने योग दिन

by Navswaraj
0 comment

अकोला : जागतिक योग दिनानीमित्त कर्ता हनुमान मंडळाचेवतीने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. कर्ता हनुमान मंडळाचेवतीने वर्षभर योग साधना वर्ग चालतात. योगगुरू विलास आगरकर येथे मार्गदर्शन देतात.

योग शिबिराचे आयोजन कर्ता हनुमान मंडळाचे अध्यक्ष माजी सैनिक सुभाष पाटील म्हैसने यांनी केले. योग व शारीरिक व्यायाम नंदा नीचळ यांनी करून घेतले. शिबिराला शंभरावर योगसाधक उपस्थित होते. यावेळी मोदी @ 9 सेवा सुशासन व गरीब कल्याणकारी योजनांची माहिती भाजपा नेते. डॉ अशोक ओळंबे यांनी देवून महाजनसंपर्क अभियानाचे महत्व विशद केले. हे अभियान घराघरात राबविण्याचे आव्हान केले. कार्यक्रमाचे आयोजन कर्ता हनुमान योग मंडळाचेवतीने करण्यात आले.

प्रमुख अतिथी म्हणुन भाजपा नेते डॉ. अशोक ओळंबे होते. अध्यक्ष हभप शिवाजी महाराज अमृतकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास आगरकर यांनी केले. प्रास्ताविक माजी नगरसेविका मंगला म्हैसने यांनी केले. भिकाजी भगत यांनी आभार मानले. योग शिबिराला डॉ. गजानन धरमकर, अनुराग आठवले, अशोक भीलकर, सचिन तायडे, रवी मेटांगे, सेल सिंग सिसोदिया, माजी सैनिक लक्ष्मण मोरे, वसंत जायदे, प्रभाकर ठाकरे, मुरलीधर झटाले, माजी सैनिक सुरेश वडे, विठ्ठल चिकटे, गजानन माळी, मुरलीधर आवटे, चंद्रकांत ताठे, महादेव खरसाडे आदींची उपस्थिती होती.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!