Home » China New Virus : चीनमध्ये कोरोनानंतर नवीन विषाणूचे संक्रमण 

China New Virus : चीनमध्ये कोरोनानंतर नवीन विषाणूचे संक्रमण 

by नवस्वराज
0 comment

Beijing | बिजिंग : कोरोनाची दहशत अजूनही लोकांमध्ये कायम आहे. कोरोनाचे कटू अनुभव आणि त्यामुळे झालेली आर्थिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक हानी लोक विसरलेले नाही. चीनमुळे संपूर्ण जगात कोरोना विषाणू पसरला. कोरोनाने जगात ७० लाख लोकांचा बळी घेतला. कोरोनाची तीव्रता थोडी कमी होत नाही, तोच चीनमध्ये एका रहस्यमय विषाणूचे पदार्पण झाल्यामुळे संपूर्ण जग पुन्हा हादरले आहे.(World In Worry Due To Entry Of New Mysterious Virus In China)

या विषाणूमुळे चीन मधील लहान मुले प्रभावित झाली आहेत. मोठ्या संख्येने लहान मुले आजारी पडत असून ताप, फुप्फुसांवर सुज येणे, सर्दी, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे चीनमधील रूग्णालये भरली आहेत, शाळा बंद केल्या आहेत. सर्वप्रथम चीनमधुन कोरोना विषाणू पसरण्याचे संकेत ‘प्रोमेड’ या संस्थे द्वारा  देण्यात आले होते. त्यानंतर संपूर्ण जगात कोरोना विषाणू पसरला. आता देखील चीनमधील लहान मुलांमध्ये पसरलेल्या रहस्यमय आजाराची माहीती ‘प्रोमेड’नेच दिली असल्यामुळे जागतिक आरोग्य संघटना (World Health Organisation) सतर्क झाली आहे. चीन सरकारकडून लहान मुलांमध्ये पसरलेल्या आजाराची सविस्तर माहिती मागवली आहे. या आजाराचा प्रादुर्भाव चीनच्या बिजिंग आणि लियाओनिंग शहरात जास्त प्रमाणात जाणवत आहे.

कोरोना निर्बंध पूर्णपणे उठवल्यामुळे मायकोप्लाझमा न्युमोनियाची (Mycoplasma Pneumonia) साथ असल्याचे एका चीनी लष्कर अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. न्युमोनिया हा संसर्गजन्य असल्यामुळे आणि कोरोना विषाणू चीनमधुन जगात पसरल्यामुळे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स देखील सतर्क झाले आहे. (All India Institute Of Medical Science) सध्या भारताला या विषाणूचा धोका नसल्याचे सांगण्यात येत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!