Home » ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना अकोल्यात केले स्थानबद्ध

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना अकोल्यात केले स्थानबद्ध

by Navswaraj
0 comment

अकोला : शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अकोल्यात आगमन होताच पोलिसांनी स्थानबद्ध केले.

पोलिसांकडून ठाकरे गटाचे ५० कार्यकर्ते स्थानबद्ध करण्यात आले आहेत. शहरप्रमुख राजेश मिश्रांचा देखील यात समावेश आहे. जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये आमदार नितीन देशमुख हे हजर झाले. शिवसेना नेते तथा जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांना सिव्हिल लाईन्स पोलिसांनी स्थानबद्ध केले. मुकेश मुरूमकार यांना त्यांच्या घरात स्थानबद्ध करण्यात आले.

जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांचे सदस्यपद बरखास्त करण्यावरून ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. ठाकरे गटाने फडणवीस यांना फडतूस म्हटले होते. त्यामुळे आज फडणवीस अकोल्यात आल्यानंतर ठाकरे गट आंदोलन करू शकतो ही शक्यता पाहता पोलिसांनी या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!