Home » राज्यातील आरटीओ कार्यालयांचे कामकाज आता दोन सत्रात

राज्यातील आरटीओ कार्यालयांचे कामकाज आता दोन सत्रात

by नवस्वराज
0 comment

मुंबई : राज्य परिवहन विभागाने राज्यातील संपूर्ण आरटीओ कार्यालयातील कामकाज दोन सत्रात घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. वाहन परवाना, वाहन नोंदणीसह इतर कामासाठी आरटीओ कार्यालयात दररोज नागरिकांची मोठी गर्दी असते. या गर्दीला नियंत्रणात घालण्यासाठी आता आरटीओचे कामकाज दोन सत्रात घेण्यात येणार आहे.

कोरोनामुळे राज्यातील अनेक शासकीय ऑफिसमधील कामकाज गेल्या दोन वर्षांपासून खोळंबले होते. आता ही विस्कटलेली प्रशासकीय घडी नीट करण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत आहे. आरटीओ कार्यालयात गर्दी होऊ नयेत, यासाठी आरटीओ कर्मचाऱ्यांना कामाचे दोन सत्राचे नियोजन केले आहे. पहिल्या सत्रात सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कामकाज असणार आहे. तर दुसर सत्रे सकाळी ११ ते सायंकाळी ७ अशी असेल. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आरटीओची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी शासनाच्या नियमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय परिवहन आयुक्त कार्यालयाने घेतलेला आहे.

error: Content is protected !!