नवी दिल्ली : जगभरात कोट्यवधी लोकांचा बळी घेणारा कोरोना ही आता जागतिक महासाथ राहिलेली नाही. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना महासाथीबाबत जागतिक आणीबाणी संपल्याची घोषणा केली आहे. ही माहिती डब्ल्यूएचओचे महासचिव टेड्रोस अधानोम घेब्रेयसस यांनी ट्विट करून दिली आहे.
टेड्रोस यांनी ट्विट केले की, “कोविड-१९ आपत्कालीन समितीची पंधराव्यांदा बैठक झाली. यादरम्यान समिती सदस्याने मला कोरोनाबाबत जागतिक आणीबाणी संपवण्याचा सल्ला दिला. जो मी स्वीकारला. मी मोठ्या आशेने कोविड-19 चा जागतिक आरोग्य आणीबाणी अंत म्हणून घोषित करतो.”
डब्ल्यूएचओचे सरचिटणीस म्हणाले, ‘आणीबाणीचा अंत करण्यात आला याचा अर्थ असा नाही की जागतिक कोविड-19 संपला आहे. गेल्या आठवड्यात दर तीन मिनिटांनी एका व्यक्तीचा कोविडमुळे मृत्यू झाला. हा दावा फक्त त्या मृत्यूंबद्दल आहे ज्यांची आपल्याला माहिती आहे.’ ते पुढे म्हणाले, ‘जगभरातील हजारो लोक अजूनही रुग्णालयात दाखल आहेत आणि जीवनासाठी लढत आहेत. त्याच वेळी, बरे होऊनही, बरेच लोक त्यानंतरच्या आजार आणि इतर परिस्थितींशी झुंज देत आहेत.’
टेड्रोस म्हणाले, ‘हा विषाणू इथेच राहण्यासाठी आहे. तो अजूनही लोकांचा जीव घेत आहे. त्याचवेळी तो बदलत आहे. नवीन रूपे उदयास येण्याचा धोका आहे’. यासोबतच त्यांनी येथे असेही सांगितले की, ‘कोरोना पुन्हा वाढल्यास भविष्यात, ते पुन्हा जागतिक आणीबाणी लावण्यास मागेपुढे पाहणार नाही.’