Home » मोदी अन् मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू : प्रकाश आंबेडकर

मोदी अन् मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू : प्रकाश आंबेडकर

by Navswaraj
0 comment

अकोला : आपल्या हातात सत्ता आल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघाचे प्रमुख मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्याचबरोबर मोहन भागवतांचे विजयादशमी मेळाव्यातील भाषण म्हणजे चोराच्या मनातले चांदणं असल्याची टीकाही आंबेडकरांनी केली.

अकोल्यात माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं की, आपल्याला सत्ता मिळाली तर आपण मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांना तुरुंगात पाठवू. भागवत यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी लोकांना भडकावून मतं घेतली जाण्याची शक्यता वर्तवली. मणिपूरमध्येही त्यांनी तेच केलं, मुसलमानांच्या संदर्भात त्यांनी तेच केलं, औरंगजेबाचं स्टेट्स ठेवल्यानंतर कारवाई करणारे तेच आहेत. दंगे भडकावणारं आरएसएसच आहे. त्यामूळे आरएसएसने लोकांना आधीच सांगितलं की आम्ही दंगली माजवून मतं घेणार आहोत. मोहन भागवत म्हणजे मोदी अन मोदी म्हणजे मोहन भागवत. संघांचे शस्त्रपूजन बेकायदेशीर असल्याचे ते म्हणाले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!