Home » Lok Sabha Election 2024 : आनंदराव अडसूळ यांचा राणा दाम्पत्यावर पलटवार

Lok Sabha Election 2024 : आनंदराव अडसूळ यांचा राणा दाम्पत्यावर पलटवार

Anandrao Adsul : आम्ही राणांचा प्रचार करणार नाही

0 comment

Amravati : आनंदराव अडसूळ हे लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार नसले तरीही वडीलकीच्‍या नात्‍याने ते नवनीत राणा यांचा प्रचार करतील, असे वक्‍तव्‍य रवी राणा यांनी अलीकडेच केले होते. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी प्रतिक्रिया देत राणांचा दावा खोडून काढला आहे. एकवेळ राजकारण सोडू, पण नवनीत राणांचा प्रचार करणार नाही, अशी प्रतिक्रिया आनंदराव अडसूळ यांनी दिली आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना वाट्टेल ते बोलण्‍याची सवय आहे, असेही त्यांनी प्रसार माध्‍यमांशी संवाद साधतांना म्हटले आहे.

अमरावती लोकसभा मतदार संघ हा गेल्या ८ निवडणुकांपासून शिवसेनेकडेच राहिला आहे. शिवसेना-भाजपची युती आजही कायम आहे. शिवसेनेचे नाव-पक्ष चिन्ह सर्व काही आमच्याकडेच अर्थात खऱ्या शिवसेनेकडे आहे. तसेच, अमरावती लोकसभेची जागा भाजपची कधीच नव्हती, त्यामुळे आम्ही आमचा दावा सोडणार नाही. राणा दाम्‍पत्‍याच्या वक्‍तव्‍यावर काय बोलावे, असेही अडसूळ म्‍हणाले. राणा दाम्‍पत्‍याला काहीही बोलण्‍याची सवय आहे. हे आपण सर्व लोक जाणतोच, एकवेळ राजकारण सोडू, पण नवनीत राणांचा प्रचार करणार नाही. किंबहुना तशी वेळच येणार नाही असा दावाही अडसुळ यांनी यावेळी केला. कपड्याच्‍या आत सगळेच नागडे असतात असा घणाघाती टोलाही आनंदराव अडसूळ यांनी लगावला आहे.

खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणाचा निकाल सर्वोच्‍च न्‍यायालयाने तुर्तास राखून ठेवला आहे. निकाल आमच्‍या बाजूनेच लागेल ही खात्री असल्याचे अडसूळ यांनी सांगीतले.

राणांना सर्वांचा विरोध – अभिजीत अडसूळ

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महायुतीतर्फे अमरावतीत घेण्यात आलेल्या मेळाव्याला प्रहार जनशक्‍ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू हे जाणीवपूर्वक गैरहजर होते. महायुतीच्‍या उमेदवार म्हणून नवनीत राणा त्यांना मान्‍य नाहीत. राणा नकोत ही सामूहिक भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांसह मित्र पक्षांच्या नेत्यांची आहे. केंद्रीय समितीला तसे स्पष्ट्च कळविण्यात आले आहे. अशी माहीती माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी सांगितले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!