Home » स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर लड्डाखच्या डेमचोक गावात पोहोचले पाणी

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर लड्डाखच्या डेमचोक गावात पोहोचले पाणी

by नवस्वराज
0 comment

लेह : केंद्र शासनाच्या ‘ जलजीवन मिशन’ अंतर्गत वर्ष २०२४ पर्यंत सर्वांना स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवण्याचा मानस आहे. लद्दाख मधील सीमेच्या नियंत्रण रेषे जवळ असलेले डेमचोक गाव १३ हजार ८०० फुट उंचीवर असून तेथे ३८ घरे आहेत.

पूर्वी गावाकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी अनेक किलोमीटर पायपीट करावी लागत होती, भारतीय लष्कराचे टॅन्कर देखील गावाला पाणी पुरवत होते. दुर्गम भागात अतिशय उंचीवर असलेल्या या गावाला ‘ जलजीवन मिशन’ अंतर्गत पाणी पुरवठा करण्याच्या हेतूने लेह येथून ३२५ किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. सौर उर्जेवर चालणारे आठ सबमर्सिबल पंप बसवले आहेत. हिवाळ्यात पाणी गोठू नये म्हणून विशेष इन्सुलेटेड पाईपचा वापर करण्यात आला आहे. ७५ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात गावाला पाणी पुरवठा सुरू झाल्यामुळे गावकरी आनंदले असून शासनाचे आभार मानले आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!