Home » महानगराला कापशी तलावातून पाणी पुरवठा व्हावा

महानगराला कापशी तलावातून पाणी पुरवठा व्हावा

by Navswaraj
0 comment

अकोला : पातूर मार्गावर, कापशी येथे तलाव आहे. त्यातून अकोला शहराला पुर्वी पाणी पुरवठा करण्यात येत होता. शहराच्या वाढत्या भौगोलिक विस्तारामुळे पाण्याची वाढती मागणी पुर्ण करणे प्रशासनाला कठीण जात होते. त्यामुळे महान येथे काटपुर्णा प्रकल्पाची निर्मिती १९७४ साली करण्यात आली. काटपुर्णा प्रकल्पातून अकोला शहराला पाणी पुरवठा करणे सुरू झाल्यावर, कापशी तलावातून पाणी पुरवठा करणे बंद झाले. त्यानंतर प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे तलावात गाळाचे प्रमाण वाढले. २००५ साली पाऊस कमी झाल्यामुळे अकोला शहराला भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले, त्या संकटातून अकोलेकरांची अद्यापही सुटका झालेली नाही. पाण्या अभावी अकोल्याच्या औद्योगिक वसाहतीतील काही उद्योग बंद झाले आहेत, तर नवीन मोठे प्रकल्प येण्यास कचरतात. यामुळे अकोल्याच्या विकासाला खिळ बसली आहे, तरूणांना नोकर्यांसाठी मोठ्या शहरांत जावे लागते.

कापशी तलावातील गाळाचा उपसा करून अकोला शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार असल्याचे कळले होते, परंतु नेहमी प्रमाणे माशी शिंकली, काम झालेच नाही. अकोला व जिल्ह्यातील मतदारांनी इच्छाशक्तीचा अभाव व विकासाची दुरदृष्टी नसलेले लोकप्रतिनिधी निवडून दिले आहेत. त्यामुळे त्यांना दोष देऊन अर्थ नाही.

कापशी तलावातून पाणी पुरवठा करणे सुरू झाल्यास त्याचा फायदा कापशी लगतची खेडी तसेच अकोला शहराला होईल. औद्योगिक वसाहतीस व शेतीस देखील नवसंजीवनी मिळेल. काटेपुर्णा प्रकल्पा वरील भार काही अंशी कमी होईल. मात्र लोकप्रतिनिधींनी उदासीनता झटकून जोरकसपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!