Home » War Tank : अकोल्यातील पिढ्या शहीदांची स्मृती जपतील

War Tank : अकोल्यातील पिढ्या शहीदांची स्मृती जपतील

Radhakrishna Vikhe Patil : पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘वॉरटँक’चे लोकार्पण

by नवस्वराज
0 comment

भूषण इंदौरिया | Bhushan Indoriya

Akola News : देशाच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद सैनिकांची स्मृती जपण्यासाठी शहीद स्मारक निर्माण करण्यात आले आहे. येणाऱ्या पिढ्यांना हे स्माकर प्रेरणा देणारे ठरेल असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

शनिवारी (ता. 10) विखे पाटील यांच्या हस्ते अकोल्यात ‘वॉरटँक’चे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, स्वातंत्र्य सैनिक विलास मुंजे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., महापालिका आयुक्त कविता द्विवेदी आदी उपस्थित होते. देशासाठी सैनिक प्राणाची बाजी लावतात. त्यांचा गौरव करण्यासाठी अकोल्यात शहीद स्मारक तयार करण्यात आले आहे. शहीद स्मारक सर्वांना प्रेरणा देत राहील असे विखे पाटील म्हणाले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!