Home » रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अकोल्यात ‘वंचित’चे रास्ता रोको आंदोलन

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अकोल्यात ‘वंचित’चे रास्ता रोको आंदोलन

by नवस्वराज
0 comment

अकोला : महापालिकेच्या हद्दीतील प्रभाग चारमधील रेल्वे गेट ते न्यू तापडिया नगर, खरप रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वंचित बहुजन आघाडीने रास्ता रोको आंदोलन केले.

रस्ता खराब असल्याने पायी चालणेदेखील कठीण झाले आहे. या परिस्थितीत वाहनधारकांना व पायी चालणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या खराब रस्त्यामुळे अनेक अपघात देखील घडत असून याची वारंवार तक्रार महापालिका प्रशासन व जिल्हा प्रशासनाला करण्यात आली आहे. तरीही कार्यवाही न झाल्यामुळे वंचित बहुजन आघाडी अकोला महानगर पूर्वच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा ईशारा देखील देण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे महानगर अध्यक्ष शंकर इंगळे, महासचिव मनोहर बनसोड, माणिक शेळके, सुगत तायडे, सचिन गोरले- पाटील, अमोल सिरसाट, आशिष सोनोने, दिनेश जगदाळे, इंगळे ठेकेदार, शैलेश देव, साजन अबगड, सुमित ठाकरे, सुरेश कलोरे, नंदू इंगळे, पुरुषोत्तम वानखडे, अंकुश तायडे, सुशील ठाकरे, अजय मस्के, अजय डाबेराव, संजय वानखडे, अशोक जाधव, रमेश प्रधान, किसन वाघमारे, आनंद इंगळे, मिलिंद बनसोड, दिलीप सिरसाट आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!