Home » ‘पदवीधर’मधील २३ उमेदवारांच्या भाग्याचा उद्या फैसला

‘पदवीधर’मधील २३ उमेदवारांच्या भाग्याचा उद्या फैसला

by नवस्वराज
0 comment

अकोला : अमरावती पदवीधर मतदार संघातील २३ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला सोमवार, ३० जानेवारी २०२३ रोजी होणार आहे. अमरावती विभागातील २ लाख ६ हजार १७२ पदवीधर मतदार उद्या आपला नवा आमदार निवडणार आहेत.

भाजपचे डॉ. रणजित पाटील, काँग्रेसचे धीरज लिंगाडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. डॉ. अनिल अमलकार यांच्यात थेट लढत दिसत आहे. याशिवाय अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. यात डॉ. गौरव गवई, अनिल ठवरे, अनंत चौधरी, अरुण सरनाईक, अॅड. आनंद राठोड, धनराज शेंडे, अॅड. धनंजय तोटे, नीलेश पवार, उपेंद्र पाटील, शरद झांबरे, श्याम प्रजापती, डॉ. प्रवीण चौधरी, प्रवीण बोंद्रे, भारती दाभाडे, माधुरी डाहारे, संदेश रणवीर, लक्ष्मीकांत तडसे, विकेश गवाले, सुहास ठाकरे, संदीप मेश्राम यांचा समावेश आहे.

पदवीधर निवडणुकीत माळी व कुणबी समाजाची गठ्ठा मते निर्णायक ठरणार आहेत. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची मतेही तितकीच महत्वाची व मोलाची असतील. त्यामुळे प्रचार थांबवला असला तरी एका रात्रीतून समीकरणे बदलण्यावर भर दिला जात आहे. त्यातूनच विजयाचे गणित निश्चित होणार आहे. पदवीधरांसोबतच मतदार संघातील शिक्षक, संस्थाचालक यांची मतेही तितकीच महत्वाची मानली जात आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!