Home » वाशीम जिल्ह्यातील पीक स्थिती चिंताजनक

वाशीम जिल्ह्यातील पीक स्थिती चिंताजनक

by Navswaraj
0 comment

वाशीम : जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने अनेक भागात पीक परिस्थिती चिंताजनक आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, म्हणून शासनदरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाही विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. वडेट्टीवार ६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात होते. त्यांनी थेट शेतीच्या बांधावर पोहोचून पीक परिस्थितीची पाहणी केली.

वाशीम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील केनवड शेत शिवारातील पिकांची पाहणी केली. यावेळी आमदार अमित झनक यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील अनेक भागात पावसाअभावी पिके कोमेजून जात असल्याने तत्काळ भरपाई मिळाली पाहिजे, यासाठी शासनदरबारी हा प्रश्न मांडणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

error: Content is protected !!