Home » Weather Updates : विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता, जाणुन घ्या विदर्भाचे तापमान

Weather Updates : विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता, जाणुन घ्या विदर्भाचे तापमान

Nagpur : उपराजधानीत ऊन-सावलीचा खेळ

by नवस्वराज
0 comment

Nagpur : महाराष्ट्रातील तापमानात वाढ होत असून राज्यातील अनेक भागात थंडी कमी झाली आहे. अनेक ठिकाणी दुपारच्या वेळी कडक ऊन जाणवत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात कडक ऊन असेल. मात्र कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस विदर्भातील बहुतांश भागात तुरळक ते हलक्या स्वरूपात पावसाच्यासरी कोसळणार असल्याचा इशारा दिला आहे. पावसांच्या ढगांनी दाटी केल्याने विदर्भातील तापमानात घट झाली असून पहाटे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात धुक्याची चादर पसरल्याचे चित्र बघायला मिळाले. पावसाचा संभाव्य धोका लक्षात घेता शेतकाऱ्यांसह नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिल्या आहेत.

जाणुन घ्या विदर्भाचे तापमान

अकोला :कमाल 31.4  किमान 17.6 | अमरावती : कमाल 32.8 किमान 15.9 | बुलढाणा कमाल 31.0  किमान 15.6 | ब्रह्मपुरी : कमाल 32.7  किमान 16.0 | चंद्रपूर : कमाल 33.4 किमान 16.0 | गडचिरोली : कमाला 30.6 किमान 14.8 | गोंदिया : कमाल 28.9 किमान 12.9 | नागपूर : कमाल 29.2  किमान 16.0 | वर्धा : कमाल 31.0  किमान 16.2 | वाशिम : कमाल 32.5 किमान 15.6 | यवतमाळ : कमाल 32.0 किमान 18.2.

चार दिवस पावसाचे

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यातील मुंबई, ठाणेसह पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीसह गोव्यातही काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांत हवामान आणखी बदलणार आहे. तर राज्यात काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. पुढील काही दिवसांत टप्प्या टप्प्याने तापमानात घट होऊन थंडी वाढणार आहे. राजधानी दिल्लीत 19 ते 21 फेब्रुवारीदरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्लीतील कमाल तापमान 24 ते 27 अंशांच्यादरम्यान राहण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये 30 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळ आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. सिक्कीम आणि ईशान्य भारतातही हलक्या पावसाची शक्यता आहे.

 

 

 

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!