Home » Vidarbha Cricket : विदर्भाने केले झारखंडच्या संघाला पराभूत

Vidarbha Cricket : विदर्भाने केले झारखंडच्या संघाला पराभूत

by नवस्वराज
0 comment

Nagpur | नागपूर : जयपूर येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात विदर्भ संघाने झारखंडचा एकतर्फी धुव्वा उडवित 10 गडी राखून विजय प्राप्त केला. त्यामुळे विजय हजारे ट्रॉफीत विदर्भाने सलग चौथा विजय प्राप्त केला आहे. (Vidarbha Cricket Team Wins Match Against Jharkhand In Vijay Hazare Trophy At Jaipur)

झारखंड संघाला १०७ धावांवर रोखून केवळ १३.४ षटकात विदर्भाने लक्ष्याची प्राप्ती केली. नाणेफेक जिंकत विदर्भाने झारखंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यश ठाकूरने २७ धावा देत ३ गडी बाद केले. अक्षय कर्णेवार आणि दर्शन नळकांडे यांनीही प्रत्येकी दोन गडी टिपले. झारखंडचे केवळ चार फलंदाज दुहेरी धावसंख्यापर्यंत पोहोचले. 33 षटकात झारखंडला थांबविल्यानंतर विदर्भाच्या फलंदाजांनी सहजपणे लक्ष्य प्राप्त केले. अथर्व तायडेने 70 धावा काढल्या. अक्षय वाडकरने 33 धावा काढत संघाने विजय प्राप्त केला. यापूर्वी मेघालय, मणिपूर आणि महाराष्ट्र संघाला पराभूत करून विदर्भ संघाने 16 गुणांसह स्पर्धेत पहिले स्थान कायम राखले आहे. दुसऱ्या स्थानावर 12 गुणांसह सर्व्हिस क्रिकेट संघ आहे. विदर्भाचा पुढील सामना आता 1 डिसेंबरला छत्तीसगड संघाविरुद्ध होणार आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!