Home » ‘गीत गाता चल’ मध्ये सुश्राव्य गीतांची बरसात

‘गीत गाता चल’ मध्ये सुश्राव्य गीतांची बरसात

by Navswaraj
0 comment

नागपूर : वैभवी म्‍युझिकल ग्रुप प्रस्‍तुत ‘गीत गाता चल भाग -2’ मध्ये रसिक श्रोते सुश्रव्या गीतांच्या पावसात न्हाऊन निघाले. लक्ष्‍मीनगर येथील सायंटिफ‍िक सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या वृंदा विकास ठाकरे यांनी कार्यक्रमाला हजेरी लावून गायकांचे मनोबल वाढविले आणि गीतांचा आनंद लुटला.

कार्यक्रमाच्या सुरवातीला श्री सिद्धीविनायक पब्लिसिटीचे समीर पंडित यांनी ‘राजू चल राजू’ हे गीत गाऊन कार्यक्रमाची उत्स्फूर्त सुरवात केली. त्यांनतर आशिष पाटील यांनी ये समा गा रहा है; गीता बावनकर यांनी हाय शर्माऊ; विजय कपले यांनी दिलबर मेरे; सायली गुप्‍ता यांनी पिया तोसे; के. एन. बैस आणि प्रिया गुप्ता यांनी बेखुदी मे सनम; जाफर हुसैन यांनी हाल क्या है; राजीव आर्य यांनी किरण यांच्या सोबत चांदनी मै ‘तेरी; अनुराधा पाटील यांनी लांबी जुदाई; स्‍नेहल सहारे यांनी ये मेरा दिल; आर्या क्षत्रिय यांनी रंगिलो म्हारो ; विजया वाइंदेसकर यांनी केह दो के तुम ; समीर पंडित आणि अंजली वानखेडे यांनी रिमझिम रिमझिम , तुषार रंगारी यांनी दुनिया मी आये हो ;सोनू जस्‍सल यांनी सातो जनम मे; धिरज ठवकर यांनी अये अजनबी तू भी कभी, स्नेहल आणि राजीव यांनी आखों से तुने; अंजलीआणि सोनू यांनी आज रपट जाये अशी विविध गीते सादर करतील. विशेष म्हणजे के. एन. बैस, प्रिया गुप्ता आणि सायली गुप्‍ता या एकाच कुटुंबातील ३ पिढ्यानी आपली गीते एकाच मंचावर सादर केलीत

परिमल जोशी यांनी कार्यक्रमाचे संगीत संयोजना केले यावेळी किबोर्डवर परिमल जोशी, ऑक्‍टोपॅडवर नंदू गोहणे, लिड गिटारवर ऋग्‍वेद पांडे, तबल्‍यावर अशोक टोकलवार, ढोलकवर पंकज यादव यांनी संगीत साथ दिली. या कार्यक्रमाचे व्‍यवस्‍थापन श्री सिद्धीविनायक पब्लिसिटीद्वारे करण्‍यात आले आहे.या कार्यक्रमाला प्रिया गुप्‍ता यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची संकल्‍पना वैभवी म्‍युझिकल ग्रुपच्‍या संचालिका किरण भोसले यांची होती आणि निवेदन डॉ. रश्‍मी बडे यांनी केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!