Home » Budget Session 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचे अंतिम बजेट येणार

Budget Session 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचे अंतिम बजेट येणार

Draupadi Murmu : राम मंदिर निर्माण, तिहेरी तलाक, कलम 370 चा उल्लेख

by नवस्वराज
0 comment

New Delhi : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी (ता. 31) संसद सदस्यांना संबोधित केले.

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मुर्मू यांनी नव्या संसद भवन इमारतीमधील त्यांचे हे पहिलेच भाषण असल्याचे सांगितले. यावेळी ऐतिहासिक सुवर्ण राजदंड सेंगोलचे अनुष्ठान केले गेले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरला. राम मंदिर निर्माण, जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद 370 काढून टाकणे अशा कामांचा मुर्मू यांनी उल्लेख केला. तिहेरी तलाक विरोधातील आणि नारी शक्ती वंदन कायद्याची त्यांनी पाठ थोपटली. आशियाई खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी 100 पेक्षा अधिक पदक जिंकले. मागील दहा वर्षांतील साधनेचा हा परिपाक आहे, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा (अंतरिम) अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला संसदेत मांडला जाईल. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामण यांचे हे सहावे ‘बजेट’ आहे. यापूर्वी अरुण जेटली, पीयूष गोयल यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात अर्थसंकल्प सादर केला. 2019 मध्ये अंतरिम बजेट पीयूष गोयल यांनी सादर केले होते. 2019 मधील निवडणुकीनंतर पूर्ण अर्थसंकल्प निर्मला सीतारामण यांनी सादर केला.

यंदा मतदारांना प्रभावित करणारे हे बजेट असेल. अंतरिम बजेट हे केवळ निवडणूक होईस्तोवर आणि केंद्र सरकारच्या उत्पन्न आणि खर्चासाठी असते. निवडणुकीनंतर सरकार स्थापन झाल्यावर जून-जुलैमध्ये सरकारचे पूर्ण बजेट सादर होईल. पीएम किसान अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधीत मिळणाऱ्या 6 हजार रुपयांत वाढ होण्याची शक्यता आहे. हा सन्मान निधी 8 ते 9 हजार रुपये होऊ शकतो. पेट्रोलियम कंपन्यांना दिलासा देण्याचा आदेश सरकार देऊ शकते.

नोकरदारांचे लक्ष बजेटमध्ये वैयक्तिक ‘इनकम टॅक्स स्लॅब’वर असते. तीन लाखांपर्यंत ‘टॅक्स’ न देणाऱ्यांचा ‘स्लॅब’ हा वाढवून तो 4 ते 5 लाख होण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात होऊ शकतो. पगारदार ज्या 80-सी मध्ये करात सवलत घेतात. त्याच्या गुंतवणुकीची मर्यादा ही दोन लाखांपर्यंत होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!