Home » बेलगाम वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक

बेलगाम वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक

by Navswaraj
0 comment

अकोला : मागील आठवड्यात उडान पुलावर भरधाव वाहनाने धडक दिल्याने सिंधी कॅम्प मधील एका तरूणीने जीव गमावला. अपघातांमुळे अनेक जण कायम अपंग झाले आहेत. महानगरात वहातूक नियमांचे उल्लंघन करून वाहन सुसाट वेगात चालवणे, रस्त्याने फटाके फोडत जाणे विनाकारण कर्कश हाॅर्न वाजवणे तसेच स्टंटबाजी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पादचारी, विशेष करून ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच लहान मुलांना रस्त्यावर चालणे अवघड झाले आहे.

बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्यांवर लगाम बसावा महानगरातील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे या दृष्टिकोनातून प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस वाहतूक शाखा तसेच महानगरपालिका प्रशासनाने विचारविनिमय करून संयुक्तपणे कारवाई करावी. वर्दळीच्या मार्गांवर गतिरोधक बसवावेत, गांधीरोड प्रमाणे आणखी काही मार्गांवर एकेरी वाहतूक सुरू करावी, वाहतुकीची कोंडी करून अपघातास कारणीभूत ठरू शकणारे, रस्त्यांवर व्यवसाय करणारे, ठिकठिकाणी ऑटोरिक्षा उभ्या करणारे ऑटोचालक, वाहनतळाची व्यवस्था नसलेले रहिवासी, वाणिज्य संकुल, हाॅस्पिटल, शाळा तसेच महाविद्यालयांवर कारवाई करावी, अशी त्रस्त नागरीकांची मागणी आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!