Home » उद्धव ठाकरेंकडे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मागितले होते : प्रफुल्ल पटेल

उद्धव ठाकरेंकडे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मागितले होते : प्रफुल्ल पटेल

by Navswaraj
0 comment

नागपूर : महाविकास आघाडी सरकार बनवण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उद्धव ठाकरे यांच्याकडे अडीच वर्षांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मागितले होते. असा गौप्यस्फोट अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तीन महिन्यांपूर्वी फूट पडून पक्षाचे दोन गट तयार झाले. अजित पवारांनी पक्षात बंडखोरी करत काही आमदार, खासदारांना बरोबर घेऊन वेगळा गट बनवला. अजित पवार यांचा गट भाजपा आणि शिंदे गटाबरोबर राज्याच्या सत्तेत बसला आहे. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत.

भारतीय जनता पार्टीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका आणि आरोप करण्यात आले. याबद्दल प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की भाजप आणि शिवसेना दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भाजप प्रमाणे शिवसेनेने ही नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रखर टीका केलेली आहे. परंतु आम्ही त्यांच्यासोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलेच ना.

महाविकास आघाडी सरकारमध्ये तुम्हाला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हवे होते का, या प्रश्नाचे उत्तर देताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की आम्हाला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद निश्चितच हवे होते. शिवसेनेकडे ५६ आमदार तर आमच्याकडे ५४ आमदार होते. त्यामुळे आम्हाला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळाले पाहिजे, असा आग्रह मी पक्षश्रेष्ठी शरद पवार यांच्याकडे केला. शरद पवारांनी मला यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणी करण्यासाठी पाठवले होते. त्यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. मी उद्धव ठाकरे यांना म्हणालो की आम्हाला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मिळाले पाहिजे. यावर उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी मौन बाळगले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!