Home » अकोल्याचा टँकर दिल्लाला नेणार; ठाकरे गटाचे आक्रमक आंदोलन

अकोल्याचा टँकर दिल्लाला नेणार; ठाकरे गटाचे आक्रमक आंदोलन

आमदार नितीन देशमुख यांच्या अटकेचा निषेध

by Navswaraj
0 comment

अकोला : बंडखोरीच्या घटनेदरम्यान करण्यात आला असा आपल्या बाबतीत पुन्हा घातपाताचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप बाळापुरचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी लावला. पोलिसांनी आपल्यावर बळाचा वापर केला असे देशमुख यांनी स्पष्ट केले. आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करायला गेलो होतो. तशी बोलणीही पोलिसांशी झाली होती. परंतु पोलिसांनी तरीही आपल्यावर बळाचा वापर केल्याचा आरोप आमदार देशमुख यांनी केला.

अकोल्यातील खारपाणपट्ट्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपले आंदोलन होते. आम्हाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुद्दाम लक्ष्य करायचे नव्हते, असेही देशमुख यांनी अकोल्यात पोहोचल्यानंतर सांगितले. खारपाणपट्ट्यातील समस्या सोडविण्यासाठी आता आपण पाण्याचा टँकर दिल्ली दरबारी नेणार असल्याची घोषणाही देशमुख यांनी केली.

टरबूज ठेवत आंदोलन

आमदार नितीन देशमुख यांना अटक केल्यामुळे अकोला शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शिवसेना शहर प्रमुख राजेश मिश्रा, तरुण बगेरे, नितीन ताकवले, नितीन मिश्रा, अतुल पवनीकर, महिला जिल्हा संघटक देवश्री ठाकरे, सुनिता श्रीवास, मंजुषा शेळके, सीमाताई मोकळकर, गजानन चव्हाण, शरद पुरकर, प्रकाश वानखडे, अंकुश चित्रे, गजानन बोराडे, योगेश गवळी, योगेश गीते, रुपेश ढोरे, सागर कवडे, अभिषेक खडसाळे, अमोल खडसान, राजेश खानापुरे, अमित भीरड, पिंटु वानखडे, राजेश इंगळे, गणेश बुंदले, गोपाल लवाडे, योगेश ठेहरे, शुभम इंगळे, संजय इंगळे, संजय अग्रवाल, मोटु पंजाबी, रोशन राज, सुनिल दुर्गे, अभिषेक मिश्रा, आकाश राऊत, बाळु ढोले पाटील, विनय लाड, अर्जुन श्रीरसागर, अण्णा बंडू सवई, अविनाश मोरे, पवन साईवाल, कालू गायकवाड, विक्की ठाकूर, गणेश मालटे, गणेश पोराकडे, अजय भटकर, दत्ता बावस्कर, बाळु चव्हाण, आशु तिवारी, मुन्ना उकडे, आशु शेगावकर, अजय दुबे, पिंटू तराडे, रवी ग्यारल, मनोज बावीस्कर, देवा गावंडे, सतीश नागदिवे, विश्वास शिरसाट, गोपाल गाडे सहभागी झाले होते.

 

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!