Home » धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही : उद्धव ठाकरे

धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही : उद्धव ठाकरे

by Navswaraj
0 comment

मुंबई : विधिमंडळातील एकनाथ शिंदे यांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली असून शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण जाण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण चिन्हासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात कायदेशीर लढाई होण्याची शक्यता आहे.  अशात उद्धव ठाकरे यांनी धनुष्यबाण शिवसेनेकडून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असा दावा केला.

शिवसेनेच्या धुनष्यबाण या चिन्हासाठीही या दोन्ही गटांमध्ये न्यायालयीन लढाई होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनीदेखील नव्या चिन्हाची तयारी ठेवा, असे आदेश दिल्याची चर्चा होती. असे असताना आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धनुष्यबाण या चिन्हाविषयी मोठे भाष्य केले आहे. शिवसेनेपासून धनुष्यबाण हे चिन्ह कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

“कायद्याने जे नमूद केलंय, त्यानुसार धनुष्यबाण कुणीही शिवसेनेकडून हिरावून घेऊ शकत नाही. ती चिंता सोडा. पण नुसतं धनुष्यबाणावरच लोक विचार करत नाहीत. धनुष्यबाण हाती घेतलेल्या माणसांची लक्षणंही लोक बघत असतात. ते मी शिवसैनिकांना सांगितलं. याचा अर्थ असा होत नाही की, नवीन चिन्हाचा विचार करा,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!