Home » अमरावती – सुरत एक्सप्रेसमध्ये दोन शयनयान श्रेणीचे डबे

अमरावती – सुरत एक्सप्रेसमध्ये दोन शयनयान श्रेणीचे डबे

by नवस्वराज
0 comment

अमरावती : रेल्वे खात्याने अमरावती-सुरत एक्स्प्रेसला अमरावती येथुन ३ डिसेंबर २०२२ पासून आणि सुरत येथुन २ डिसेंबर २०२२ पासून दोन शयनयान श्रेणीचे डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

अमरावती-सूरत एक्सप्रेसची सुधारित संरचना आता अशी असेल. एक वातानुकूलित चेअर कार, दोन शयनयान डबे, चार द्वितीय श्रेणी चेअर-कार, दोन गार्ड ब्रेक व्हॅनसह १० सामान्य द्वितीय श्रेणीचे डब्बे. ट्रेन क्रमांक 20926 मधील शयनयान श्रेणीचे आरक्षण, बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर आधीच सुरू झाले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!